सोमेश्वर कारखाना हंगाम तयारी सुरू : रोलर पूजन संपन्न

Pune Reporter
सोमेश्वर कारखाना हंगाम तयारी सुरू : रोलर पूजन संपन्न

सोमेश्वरनगर :  प्रतिनिधी 

सोमेश्वरनगर ता. बारामती येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन समारंभ    संचालक विशाल गायकवाड व कार्यकारी  संचालक राजेंद्र  यादव याच्या शुभहस्ते पार पडले.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ सोशल सोशल डिस्टशिंग चे पालन करत पार पडला.  
या प्रसंगी  कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष धुमाळ, चीफ इंजिनिअर एस. एन. टेंगले, मुख्य शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड,चिफ केमिस्ट शिवशंकर भोसले, डिस्टलरी मॅनेजर एस. डी  निंबाळकर , चिफ अकाऊंटंट योगीराज नांदखिले, लेबर ऑफिसर दीपक निंबाळकर, वीज  प्रकल्प अधिकारी एस .एस गावडे, स्टोअर किपर एस.डि.धुमाळ, केनयार्ड सुपरवायझर वाय.जी पाटील, आदी च्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले की, येणारा हंगाम हा आवाहनात्मक असून उसाचे क्षेत्र जादा आहे. याबाबत कारखान्याने कारखान्याने संबंधीत यंत्रणेशी करार केले आहेत
To Top