पुरंदरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७३ तर आजपर्यंत १० बळी
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवसह ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवार दि. १५ रोजी दिवसभरात २ कोरोना मृत्यु जाहिर झाले तर १५ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आजपर्यंतचे पुरंदर तालुक्यातील कोरोनाचे १० बळी तर २७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
सासवड येथून ६० स्वॅप पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५० चे अहवाल प्राप्त. १५ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १० सासवड (२ नवीन, ८ हायरिस्क), ५ ग्रामीण (कोंडीत बु ३ ,गराडे १, पिसर्वे १) असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS