निरेतील पहिला रूग्ण बरा होऊन घरी : ग्रामपंचायती कडून स्वागत

Admin
 निरेतील पहिला रूग्ण बरा होऊन घरी : ग्रामपंचायती कडून स्वागत

निरा : प्रतिनिधी

निरा येथील एका युवकाचा कोरोना अहवाल दि २२ रोजी पॉझिटिव्ह आला होता. मात्र आठ दिवसांंच्या कालखंडानंतर निरेतील पहिला  कोरोनाबाधित युवक पुणे येथील खाजगी हाँस्पिटल मध्ये उपचार घेऊन
आज बुधवारी (दि.२९) तो  निरा येथे परतला आहे.
          वास्तविक हा युवक  तापाने आजारी होता. त्यावर निरा येथील खाजगी हाँस्पिटल मध्ये उपचार  सुरू होते.मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला सासवड किंवा पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल करणे गरजेचे होते. तत्पुर्वी सद्या कोरोनाच्या संसर्गामुळे पुणे येथील कोणत्याही हाँस्पिटल मध्ये रूग्णांस दाखल करण्यापुर्वी त्याची कोरोनाची चाचणी करावी लागते. त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या युवकाची कोरोनाची चाचणी करण्यात आली . त्यात तो दुर्दैवाने पाँझिटिव्ह आला. मात्र आज तो ठणठणीत बरा होऊन आज घरी परतला. निरा ग्रामस्थ आणि निरा ग्रामपंचायतिच्या वतीने त्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 
              
          
To Top