वाघळवाडीतील सोमेश्वर आयसीयू मध्ये खुब्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर - वाघळवाडी येथील सोमेश्वर आयसीयू मध्ये खुब्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी पार पार पडली आहे. दि २७ रोजी सायंकाळी निखळलेल्या खुब्याची ( Anteriror Hip Dislocation) दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली. वैद्यकीय अस्थिरोग विषयात अशा प्रकारची खुबा निखळण्याची शक्यात खूप दुर्मिळ प्रमाणात सापडत असल्याचे पुण्यातील हार्डीकर हॉस्पिटल येथील अस्थिरोग तज्ञ डॉ.सचिन नागापूरकर यांनी सांगितले.
अशा अपघाती केस मधे खूबा हा मागच्या बाजूला निखळला जातो पण सोमेश्वर आय सी यू मधे जो रुग्ण होता त्याचा खुबा अपघातामध्ये पुढील बाजूला निखळला होता. ही शस्त्रक्रिया सोमेश्वर सारख्या ग्रामीण भागात मी यशस्वी करू शकलो याचा मला अभिमान आहे. ही शस्त्रक्रिया करण्याची संधी मला सोमेश्वर आय सी यू चे डॉ.अनिल कदम यांनी दिली त्या बद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी हॉस्पिटलचे डॉ.अनिल देशमुख , डॉ.सुरज सोनवलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
COMMENTS