बारामतीत अजून एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह : सुर्यनगरी भागातील पेशेंट च्या संपर्कातील एकजण पॉझिटिव्ह

Admin
बारामतीत अजून एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह : सुर्यनगरी भागातील पेशेंट च्या संपर्कातील एकजण पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर  : प्रतिनिधी
 
बारामती या ठिकाणी काल रात्री  १५ लोकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी १४ रिपोर्ट निगेटीव्ह आले असून एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
           आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री १५ स्वॅब नमुने घेतले होते त्यापैकी १४ निगेटिव्ह व सूर्य नगरीतील पेशंटच्या संपर्कातील गुणवडी येथील १ तरुण पॉझिटिव आलेला आहे तसेच आज सकाळी इतर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व  काही संशयित असे ३६ नमुने घेतलेले आहेत त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे

बारामतीत कोरोनाची सत्तरी-----------
बारामती तालुक्यात आता पर्यंत ७० जणांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या असून यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून २९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. 
To Top