सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम2020 - 21मध्ये सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम2020 - 21

मध्ये सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020

 

       बारामती, दि. 17 :-

 प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020-21 पासून तीन वर्षाकरीता राज्यात राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पीकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हेतू साध्य हाण्यास मदत ही योजनेची उद्दीष्ट्ये आहेत.

            सदर योजना ही अधीसूचीत केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पीकांसाठी असेल, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीकांसाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत, या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे, या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2.0 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे, ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

            या योजनेंतर्गत पुढील कराणांमुळे होणाऱ्या पीकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाईल. यामध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पीकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणी पर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर , क्षेत्र जलमय होणे, भूसख्खलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग यामुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे पीकांचे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पीकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान इत्यादी. या योजनेमध्ये बारामती तालुक्या करीता बाजरी, भूईमूग , तूर , सोयाबीन  व कांदा इत्यादी पीकांचा समावेश करण्यात आला आहे.

            योजनेच्या अधिक माहितीसाठी विमा कंपनी , एच.डी.एफ.सी, इरगो इन्शुरन्स कंपनी, पुणे (विमा कंपनी प्रतिनिधी – शेखर कपाले, मो.नं :- 7387979793) तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा, नजिकचे विविध कार्यकारी सोसायट्या, कृषि खात्याचे कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बारामती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेमध्ये सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020 पर्यंत आहे. गर्दी टाळण्यासाठी अंतिम दिनांकाची वाट न पाहता त्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरण्याची कार्यवाही करावी असे आवाहन, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7025,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम2020 - 21मध्ये सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम2020 - 21मध्ये सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020
https://lh3.googleusercontent.com/-rhl-Krqv2zc/XxGLOA9GRmI/AAAAAAAACdw/EmfooiF7xk8FoaGNjqqMxhm6x_HHLfjbwCLcBGAsYHQ/s1600/1594985269724646-0.png
https://lh3.googleusercontent.com/-rhl-Krqv2zc/XxGLOA9GRmI/AAAAAAAACdw/EmfooiF7xk8FoaGNjqqMxhm6x_HHLfjbwCLcBGAsYHQ/s72-c/1594985269724646-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/2020-21-31-2020.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/2020-21-31-2020.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy