सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Followers

विशेष माहिती

खाजगी रुग्णालयांमधील कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण घरी पाठवा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम

खाजगी रुग्णालयांमधील कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण घरी पाठवा                           -  जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुणे, दिनांक...

खाजगी रुग्णालयांमधील कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण घरी पाठवा

                          -  जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे, दिनांक 17- 

खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित म्हणून उपचार घेत असलेल्या तथापि, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना घरी पाठविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष  नवल किशोर राम यांनी कळवले आहे. जे रुग्ण कोरोना बाधित म्हणून उपचार घेत आहेत आणि कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र असे रुग्ण घरी जाण्यास नकार देत असतील तर त्यांची यादी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठविण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी राम यांनी कळवले आहे.

             खाजगी रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेण्यासाठी जिल्हा स्तरावर तपासणी पथक स्थापन करण्यात आले असून या पथकामार्फत तपासणी करण्‍यात येणार आहे. जर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुग्णालयात आढळून आले तर संबंधित रुग्‍णालयाच्या प्रशासनावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणाचे अध्यक्ष  नवल किशोर राम यांनी दिला आहे.

            आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे या  प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

COMMENTS

test
Name

blogg,2,Breaking News,1034,breaking news is,1,breking news,3,video,1,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : खाजगी रुग्णालयांमधील कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण घरी पाठवा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
खाजगी रुग्णालयांमधील कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण घरी पाठवा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
https://lh3.googleusercontent.com/-ElOZiTtjdg0/XxGK2anQzhI/AAAAAAAACdo/oIiU40qQb1MdcLHs58TTmG_XM5Bn8HE7QCLcBGAsYHQ/s1600/1594985172828335-0.png
https://lh3.googleusercontent.com/-ElOZiTtjdg0/XxGK2anQzhI/AAAAAAAACdo/oIiU40qQb1MdcLHs58TTmG_XM5Bn8HE7QCLcBGAsYHQ/s72-c/1594985172828335-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_292.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_292.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy