उद्योजक आर.एन. शिंदे यांना खंडणी मागणारा नाशिक मधून जेरबंद
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक आर एन शिंदे यांना २ कोटींची खंडणी मागणाऱ्या खंडणी भादराच्या मुसक्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी नाशिक मधून असिफ मणियार याला अटक करून आज दि १३ रोजी न्यायालायत हजार केले असता त्याला १५ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. वडगाव निंबाळकर चे सह्ययक पोलीस उपनिरीक्षक गणेश कवीतके, पोलीस हवालदार महेंद्र फणसे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लोहकरे आणि ताडगे यांच्या टीम ने ही कारवाई केली.
उद्योजक शिंदे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी २९ मार्च रोजी वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. बारामती तालुक्यातील आर.एन.शिंदे हे प्रसिध्द उद्योगपती आहेत.
सोमेश्वरनगर येथील तिरुपती बालाजी मशरुम कंपनी याचे ते मालक आहेत. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनला असिफ मनियार रा. नाशिक याच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपी असिफ मनियार हा १ जाने २०२० पासुन २१मार्च पर्यंत आर एन शिंदे यांच्या मोबाइलवर वेळोवेळी फोन करून मेसेज करून पैशाची मागणी करत होता. दि १९/३/२०२० रोजी शिंदे यांच्या मोबाइलवर इंग्रजीमध्ये 2 K अशा टेक्स मेसेजपाठवून नंतर २१/३/२०२० रोजी फोन करून फोनवरून तुम्हीदोन दिवसांपूर्वी मेसेज केला ते तेवढे तयार ठेवा असे शिंदे यांनाबोलून 2K शिंदे यांनी म्हणजे काय असे विचारले त्यावरआरोपीने शिंदे यांना दोन कोटी रुपयांचे सांगितले व खंडणीचीमागणी करत ते पैसे तुम्ही दिले नाही तर तुम्हाला संपविन अशी धमकी दिली होती. आज पाच महिन्यानंतर शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सह्ययक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीम करत आहे
COMMENTS