बारामतीत आज दिवसभरात २१ जण कोरोनाबाधित : रुग्णसंख्या ५४१ वर

Admin
बारामतीत आज दिवसभरात २१ जण कोरोनाबाधित : रुग्णसंख्या ५४१ वर 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल बारामती मध्ये एकूण ११५ नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी १०२ जणांचा अहवाल निगेटिव्हआला असून बारामती शहरातील ११ व ग्रामीण भागातील दोन असे १३ रुग्णांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच आज दिवसभरात बारामती मध्ये एकूण २४ जणांचे  नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील ५ व ग्रामीण भागातील तीन असे आठ  रुग्णांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव आलेला आहे त्यामुळे आज दिवसभरात २१ रुग्ण बारामती मध्ये आढळून आले आहेत व बारामतीची  रुग्णसंख्या ५४१ झाली आहे

rt-pcr पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पाटस रोड येथील 2, शंकर भोई गल्ली येथील चार, खंडोबा नगर येथील 2, कसबा येथील एक, सिद्धार्थ नगर येथील एक,फलटण रोड येथील एक  व ग्रामीण भागातील काटेवाडी येथील एक व वडगाव निंबाळकर येथील एक असे 13pcr  पॉझिटिव्ह तसेच एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  शहरातील देसाई इस्टेट येथील 2,विवेकानंद नगर येथील एक, सूर्यनगरी येथील एक व अमराई येथील एक व वडगाव निंबाळकर येथील एक, वानेवाडी येथील एक आणि गुणवडी येथील एक अशा रुग्णांचा समावेश आहे

To Top