निरा आणि मांडकी मधील डॉक्टरांनाच कोरोनाची लागण : रुग्णसंख्या ८४० वर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड, मांडकी, निरा, लपतळवाडी येथील एकूण सात रुग्णांची खाजगी कुरणावर पॉझिटिव आले आहे त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ८४० झाली आहे. तर कोरोना मृत्यू ३४ झाले आहेत.
दिनांक २३/०८/२०२० रोजी खाजगी हाँस्पिटल पाँझिटिव्ह रुग्ण सासवड येथील २, मांडकी येथील ३, निरा येथील १, तोंडल (लपतळवाडी) येथील १ अशा एकूण ७ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील एकाच कुटुंबातील पती-पत्नींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरी व्यक्ती ही व्यवसायाने डॉक्टर आहेत. निरा शहरात ही आज एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांना आता कोरोंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य केंद्राच्या वतीने येत आहेत. काही लोकांची कोरोना तपासणी करावी लागणार आहे.
COMMENTS