सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळातील ५२ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(डिप्लोमा) च्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अंतिम वर्षाच्या सुमारे ५२ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यु मधून निवड करण्यात आली आहे. यामध्ये टाटा मोटर्स मध्ये १८, कमिन्स इंडिया लि. सुरवडी येथे १०, पियायो व्हेइकल मध्ये ९, भारत फोर्ज मध्ये ५. इज माय होम ५ आणि अन्य कंपन्या असे मिळून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. याच बरोबर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागातील शंभर टक्के विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच सिव्हिल व कॅंप्युटरच्या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून विद्यार्थ्यांना वार्षिक सव्वालाख ते तीन लाख रुपये वेतन देवून त्यांची ट्रेनी इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या डिप्लोमा, सायन्स, अभियांत्रिकी महाविद्यालयाने अल्पावधीत दर्जेदार विद्यार्थी घडवून त्यांच्या नोकरीसाठीही प्रयत्न केले आहेत.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेंद्र रासकर, महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष किशोर भोसले, सचिव भारत खोमणे, प्राचार्य एस. के. हजारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. एम.ए. भोईटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विभागप्रमुख प्रा. व्ही. पी. भापकर, प्रा.आर. आर. कदम, प्रा. एस. बी. गावडे, प्रा. एन. आर. घाडगेयांचे सहकार्य लाभले.
COMMENTS