बलात्कार प्रकरणातील पुरंदर पंचयत समितीचा तो ग्रामसेवक अखेर निलंबित
पुरंदर : प्रतिनिधी
अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने प्रियसीच्या मदतीने तिच्या पतीचा खून करण्याचा प्रयत्न करणे तसेच त्याच अवस्थेत हिवरे ता पुरंदर येथील डोंगराळ भागात बेवारस स्थितीत टाकून पुरावा नष्ट करणे. त्याचप्रमाणे एक अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करणे या गुन्हा वरून सासवड पोलिस स्टेशनच्या कोठडीत असलेल्या प्रियकर ग्रामसेवक रमेश भालेराव सासवड (ता पुरंदर जि पुणे) यास निलंबित करण्यात आले आसल्याचे. पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी सांगितले
याबाबत सविस्तर वृत्त असे की पुरंदर मधील रमेश जयवंत भालेराव याचे वृषाली संतोष चव्हाण (भादे ता खंडाळा जि सातारा) हिच्यासोबत विवाह बाह्य अनैतिक संबंध होते. तसेच या संबंधास वृषाली चा पती संतोष बाळासाहेब चव्हाण यास विरोध होता. त्यामुळे रमेश भालेराव आणि वृषाली चव्हाण यांनी संगनमताने त्यास अनोळखी ठिकाणी बोलवून घेऊन दगडाने ठेचून खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यास त्याच्या अवस्थेत तिथे टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर आरोपी रमेश भालेराव याने एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यावर बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आरोपीस दोन्ही गुन्ह्याच्या कारणावरून तब्बल चौदा दिवसांची वेळोवेळी पोलीस कोठडी देण्यात आली होती.
पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे व राजेश माने या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे चौकशी केली. तर पोलिसांचा दोन्ही गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यास पुणे येथील येरवडा कारागृहात पाठविण्यात आले. दरम्यान गुन्ह्याची माहिती सासवड पोलिसांनी पुरंदर पंचायत समितीला कळविल्यानंतर गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी ग्रामसेवक रमेश भालेराव या अटक केल्याच्या दिवसापासून निलंबित केल्याचे पत्र दिले आहे. तसेच याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याबाबत माहिती दिली आहे. याबाबत माहिती देताना पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी सांगितले की ग्रामसेवक रमेश भालेराव या विविध गुन्ह्याखाली अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
COMMENTS