सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Followers

विशेष माहिती

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे -पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे                -पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम          पुणे दि.29-   पुणे शहराबरोबर...

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे

              -पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम


        पुणे दि.29- 

पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावेअसे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी  केले.

             पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात प्लाझ्मादाता गौरव कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवेअपर पोलीस आयुक्त संजय शिंदेपोलीस उप आयुक्त मितेश घट्टे आदी उपस्थित होते.

            पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम म्हणालेकोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या http://puneplasma.in या वेबसाईटवर किंवा सहायक पोलीस निरीक्षक शिंत्रे मो.नं.9960530329 या  व्हॉटस्अपवर मेसेजव्दारे प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी.  पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे यांनी हे चांगले व्यासपीठ तयार केले आहे. बोलणारे भरपूर बोलतात पण आपण सर्व प्लाझ्मादान करणाऱ्यांनी जे काही करुन दाखविले याचा मला आनंद आहे.  पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. ज्यांना ज्यांना प्लाझ्माची गरज आहे त्यांना  ते देण्यासाठीच आपण हा उपक्रम राबवत आहोत. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतोअसेही ते म्हणाले.

            यावेळी प्लाझ्मा दाते करण रणदिवेमोहिम नलावडेराहुल तुपेवैभव लोढाअजय मुनोतराहुल लंगर,जमीर शेखअवधुत दिवटेवैभव भाकनकुणाल तोडीमोहित तोडी यांना पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

            पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे म्हणालेआपण सर्वांनी सगळया शंका-कुशंकांवर मात करुन अनेकवेळा प्लाझ्मा दान केले आहे. तुमची ही कृती फार महत्त्वाची असून एखाद्याचा जीव वाचविणे हे एक मोठे काम आहे. तुमच्या मनात जागृत झालेली ही भावना अशीच पुढे चालू राहून समाजात एक मोठी चळवळ झाली पाहिजे. ही मोहीम शहराबरोबरच ग्रामीण भागातही राबवावी. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावेअशी भावना त्यांनी  व्यक्त केली.

            यावेळी प्लाझ्मा दाते अजय मुनोतराहुल लंगरवैभव भाकन व प्लाझ्मा स्वीकारणारे संदिप सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले.

            पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना म्हणालेकोरोनावर मात करण्यासाठी पुणे शहर पोलीस विभागाने प्लाझ्मा थेरपी हा चांगला उपक्रम हाती घेतला असून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केलेल्या आवाहनामुळे 405 प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक रुग्णाने मदतीचा हात पुढे करुन प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. यामुळे प्लाझ्मा दाता एक मोठी चळवळ होऊ शकेल. उपस्थितांचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी आभार मानले.

            यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारीकर्मचारीप्लाझ्मा दाते व प्लाझ्मा स्वीकारलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

COMMENTS

test
Name

blogg,2,Breaking News,1051,breaking news is,1,breking news,3,video,1,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे -पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम
प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे -पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम
https://lh3.googleusercontent.com/-3S8dkNSosoo/X0pUKncAMMI/AAAAAAAAC0I/a6jOIf87QsEEJw1G5001cr-EvTvWShi-ACLcBGAsYHQ/s1600/1598706716932041-0.png
https://lh3.googleusercontent.com/-3S8dkNSosoo/X0pUKncAMMI/AAAAAAAAC0I/a6jOIf87QsEEJw1G5001cr-EvTvWShi-ACLcBGAsYHQ/s72-c/1598706716932041-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_348.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_348.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy