निरा येथील दोघांसह पुरंदर तालुक्यात आज सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड सह सोमर्डी, जवळार्जून, रिसे, येथील प्रत्येकी एक तर निराश येथील दोन एकूण सहा रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ७५३ झाली आहे तर मृत्यु ३१ झाले आहेत
पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी येथील १, जवळार्जुन येथील १, सासवड येथील १, रिसे येथील १, नीरा येथील २, असे एकूण ६ खाजगी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे. त्यामुळे आता सासवड मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३२२, जेजुरी ८३, सोनोरी ४३, गराडे २६ तर निरा १९ झाली आहे.
आज निरा शहरातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एक महिला डॉक्टर असून त्या आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी आपल्या मुळ गावी गेल्या होत्या. त्यांनी परतीच्या प्रवासा अगोदर कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या निरेतील कोणाच्या ही संपर्कात आलेल्या नाहीत त्यांनी स्वत: ला नगररोडवरील आपल्या रुग्णालयातच होम कॉरंटाइन करत होम आयशुलेशन द्वारे उपचार सुरू केले आहेत. तर दुसरी व्यक्ती निरेतील प्रभाग क्रमांक दोन मधिल केळीचा कोठा असलेल्या गर्दिच्या ठिकाणीचु मुळ रहिवासी आहेत. ते पुर्वी येथील महाविद्यालयात लॉब टेक्निशियन होते. सध्या ते सेवेतून निवृत्त आहेत. पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
COMMENTS