भोरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह @ ५०९ : दिवसभरात ४२ जणाची भर: आत्तापर्यंत ३७९ जणांची मात
माणिक पवार
भोर : प्रतिनिधी
भोर आणि वेल्हा तालुक्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत कोरोना वेगाने पसरत आहे. दररोज १० च्या घरात बाधित आढळत असतानाचा दिवसभरात ४२ कोरोना बाधितांची भर पडल्याची नोंद झाली असून गेल्या सात दिवसात भोर तालुक्यात ११० हून अधिक कोरोना बाधितांची भर पडली भोरमध्ये कोरोनाच्या आकड्याने अवघ्या काही दिवसांतच सहाशेचा आकडा पार केला असून आत्तापर्यंत २१ जन दगावले आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
भोर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनान तारेवरची कसरत करत असतानाच काल दि. २७ बुधवारी या एकाच दिवसात चार जण कोरोना बाधितांची भर पडली पडल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. अत्यावशक आणि वैदकीय सेवा वगळता भोर तालुका १४ दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली असून तालुक्यात आजपर्यंत ५०९ कोरोना बाधित आढळले असून ३७९ जणांनी कोरोनावर मात केली असून १०९ जणावर उपचार सुरु असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
शहरातील कामगार आणि ग्रामीण भागातील काही बेशिस्त नागरिकांच्या बेधडक प्रवासामुळे केवळ एका आठवडयात भोर तालुक्यात ११० अधिक जण कोरोना बाधितांची भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावशक आणि वैदकीय सेवा वगळता प्रतिबंधित क्षेत्रात १४ दिवस पूर्णपणे लॉकडाऊन केव्हाही प्रशासनाकडून लागू करण्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर तालुक्यातील वीस गावातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नाकाबंदी करण्यात आल्याचे भोरचे पोलीस निरीक्षक राजू मोरे आणि राजगडचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भोरमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून भोरमधील विविध कॉविड सेंटरमध्ये रूग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र बाहेरगावी आणि शहराकडे नोकरीला जाणा-या कर्मचा-यांना कोरोनाची लागण होत असून त्यांच्या संपर्कातील लोकांनाही करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रूग्णांमध्ये लहान बालक आणि मुलांचंही प्रमाण वाढत आहे. तालुक्यात कोरोनाचा एकीकडे आकडा सहाशेच्या वर गेला असला तरी अजूनही काही नागरिक गांभीर्य घेत नसून विनामास्क व विनाकारण बेशिस्त नागरिक मोठ्या संख्येने अद्याप बाहेर फिरताना दिसत आहेत. यामुळे येणारा काळ भोरसाठी अधिक आव्हानात्मक असणार हे नक्कीच!!
कोरोनाचाअजित पाटील, तहसीलदार भोर
संसर्ग टाळण्यासाठी २० गावामध्ये प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. दुकानदार आणि नागरिकांनी सुद्धा नियमांचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकनारे, विनामास्क विनाकारण घराबाहेर पडणारे शिस्तीचे पालन न करणाऱ्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना सूचना देण्यात आले आहे.
COMMENTS