सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

मु.सा. काकडे महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

मु.सा. काकडे महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न 

सोमेश्वरनगर प्रतिनधी
       मु. सा.काकडे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने  शुक्रवार दिनांक 21ऑगस्ट  या दिवशी 'मराठी भाषा, साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर' यावर  ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. कोविड -19 मुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा सामना अनेक दिवस आपण करत आहोत. करोना या महामारीचे दूरगामी परिणाम अखिल मानवजातीवर होणार असून आपणास यापुढेही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व आव्हानांना झेलत, शासनाच्या आदेशांचे पालन करत आपण सर्वजण आपली सामाजिक, शैक्षणिक जबाबदारीही पूर्ण करत आहोत. त्याबरोबरच विचारांची देवाण-घेवाण व समाजात येऊ घातलेल्या या बदलाला सामोरे जाताना ज्ञानदान आणि ज्ञानार्जन या प्रक्रियाही अव्याहतपणे चालू ठेवण्याचा उपक्रम अनेकजण करत आहेत. याचाच एक भाग म्हणून मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर, बारामती. याठिकाणी मराठी  विभागने "मराठी भाषा, साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर"  या विषयावर  एक दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केले होते. आजच्या या महामारीच्या पार्श्वभूमीवर साहित्याच्या अभ्यासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल,  तंत्रज्ञानाच्या उपयोजनाचे सामर्थ्य आणि मर्यादा यावर  या वेबिनारमध्ये चर्चा झाली.
  या वेबिनारचे उदघाटन महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस येथील डॉ. मधुमती कुंजल यांनी केले. मॉरिशस मधील परिस्थिती,  तेथील भाषा,  संस्कृती, परंपरा आणि मराठी भाषा यांचा अनुबंध त्यांनी उलगडून दाखविला.  बीजभाषण ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधाकर शेलार यांनी केले. आधुनिकतेच्या इतिहासाचा परामर्श घेत समकालीन वास्तवावर त्यांनी प्रकाश टाकला.

       या वेबिनारमध्ये तीन साधन व्यक्तींनी आपले विचार मांडले. त्यात डॉ. स्नेहा महांबरे (गोवा) यांनी 'गोमंतकीय मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान'  या विषयावर आपले विचार व्यक्त केले. डॉ. राजेंद्र  सांगळे (नाशिक) यांनी 'प्रभावी अध्यापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर'  या विषयांतर्गत प्रभावी अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा सुलभपणे करता येऊ शकतो ते अतिशय प्रभावीपणे सांगितले. तर  प्रकाशक बाळासाहेब घोंगडे (पुणे) यांनी 'आजच्या तंत्रज्ञानप्रधान काळातील साहित्य व्यवहाराचे बदलते स्वरूप' या विषयावर  प्रकाशन व्यवसायातील आपले अनुभव मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई यांनी अध्यक्षीय समारोप केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. जया कदम यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. डॉ.संजू जाधव यांनी आभार मानले. तर  या ऑनलाईन वेबिनारचे तंत्र सहाय्यक म्हणून रजनीकांत गायकवाड यांनी काम पाहिले . या वेबिनारसाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सतीशभैय्या काकडे देशमुख, सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे आणि उपसचिव सतीश लकडे यांचेही सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापकांचेही  सहकार्य लाभले. सदर वेबिनारसाठी देश-विदेश, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून एकूण 600  प्रतिनिधींनी नावनोंदणी केली होती.
 फोटो ओळ :आंतरराष्ट्रीय वेबिनारचे उदघाटनप्रसंगी  विचार व्यक्त करताना मॉरिशस येथील डॉ. मधुमती कुंजल

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6979,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : मु.सा. काकडे महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
मु.सा. काकडे महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
https://lh3.googleusercontent.com/-OKIXg4whdcY/X0ZRMFqqZeI/AAAAAAAACwY/c42ATyBa-6cjR7rcslvSDCBnHeOgl2f2gCLcBGAsYHQ/s1600/1598443820146867-0.png
https://lh3.googleusercontent.com/-OKIXg4whdcY/X0ZRMFqqZeI/AAAAAAAACwY/c42ATyBa-6cjR7rcslvSDCBnHeOgl2f2gCLcBGAsYHQ/s72-c/1598443820146867-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_702.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_702.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy