राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग मधील चार कामगारांच्या संपर्कातील ४० जण क्वारंटाईन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी कोरोनाने प्रवेश केला आहे. शुक्रवारी (दि.२१) येथील चार शेती कामगारांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर या कामगारांच्या संपर्कातील ४० जणांचे स्वॅब घेण्यात आले असुन सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.या सर्वांवर बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार या चौघांची प्रकृती स्थिर आहे.त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.चौघाजणांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. चौघांच्या प्रत्येकी दहाजणांचे स्वॅब घेण्यात आल्याचे डॉ.खोमणे यांनी सांगितले.
COMMENTS