माळेगाव’ साखर कारखान्याच्या कार्यालयातुन 'प्रमोशन ऑर्डर फाईल' ची चोरी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याच्या कार्यालयातुन चक्क 'प्रमोशन ऑर्डर फाईल' ची चोरी झाली आहे.यानंतर कार्यकारी संचालकांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी कार्यकारी संचालक विजय मुकुटराव वाबळे (वय ६५ वर्ष) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान हा प्रकार घडला आहे.
अज्ञात आरोपी १ ते ३१ कामगारांपैकी कोणीतरी एक असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासकीय इमारती मधीलकपाटातून 'प्रमोशन ऑर्डर फाईल' चोरून नेल्या आहेत. मुद्दाम लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेल्याचे देखील फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
COMMENTS