सोमेश्वरनगर प्रतिनिधी दि :१६
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील एक जणाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे .
संबंधित रुग्ण हा सोमेश्वरनगर येथे एका खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत होता त्याला त्रास जाणून लागल्यानंतर त्याची कोरोणा चाचणी करण्यात आली त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्हि अाला अाहे.
आज बारामती तालुक्यामध्ये ३८जणांचे अहवाल पॉझिटिव्हि आले असून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपण अनावश्यक घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व सॅनिटायझरचा व मास्कचा वापर करावा तसेच ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये व घरातील तरुणांनी घरात आल्यानंतर सुद्धा नागरिकांपासून अंतर ठेवून राहावे जेणेकरून आपणाला कोरोणापासून बचाव करता येईल
COMMENTS