वाणेवाडी येथे ट्रान्सफारमध्ये शॉर्टसर्किने आग लागल्याने ड्रीप जळून एक लाखाचे नुकसान
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी मळशी येथे ट्रान्सफारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विक्रम आनंदराव भोसले या शेतकऱ्यांचे ड्रीप जळून नुकसान झाले आहे. विक्रम भोसले यांच्या मळशी या ठिकाणी शेती असून त्यांच्या शेतात सार्वजनिक डी पी आहे. या ट्रान्सफारमध्ये आज दुपारी शॉर्टसर्किट होऊन आग लागली यामध्ये डी पी जवळच भोसले यांनी दोन एकरातील ड्रीप जमा करून ठेवले होते, या आगीत हे ड्रीप जळून भस्मसात झाले, तर जवळच भोसले यांचा पाच एकर ऊस होता मात्र शेजारील शेतकऱ्यांनी वेळीच आग विजवल्याने पुढील अनर्थ टळला
COMMENTS