बारामती तालुक्यात सहा जणांचा पॉझिटिव्ह

Admin
बारामती तालुक्यात सहा जणांचा पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

 काल बारामती मध्ये एकूण 47 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 25 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये  बारामती  शहरातील चार व व तालुक्यातील डोरलेवाडी येथील एक पुरुष व जायपत्रे वाडी मुढाळे येथील एक पुरुष असे एकूण सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व  इंदापूर तालुक्यातील दोन रुग्ण पाॅझिटीव आले आहेत व 22 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे आणि 17 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे
 बारामती शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये समर्थ नगर मधील एक रुग्ण तांबे नगर मधील एक रुग्ण तसेच कचेरी रोड येथील एक रुग्ण व पाटस रोड येथील एक रुग्ण अशा 4 रुग्णांचा समावेश असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली
To Top