सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाबालालजी काकडे यांची पुण्यतिथी संपन्न
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने माजी अध्यक्ष बाबालालजी काकडे यांची आठवी पुण्यतिथी संपन्न झाली.
मु सा काकडे महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे अध्यक्ष सतिश काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोमप्रसाद केंजळे, भीमराव बनसोडे, प्रा रवींद्र जगताप, पत्रकार मित्र तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
काकडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. दि ३१ जुलै रोजी प्रा, एम बी जगताप, प्रा, के डी जगताप व प्रा, राणी शेंडकर दि १ ऑगस्ट रोजी डॉ जगन्नाथ साळवे, प्रा डॉ देविदास वायदंडे व डॉ एस पी जाधव यांचे तर दि २ रोजी डॉ सोमप्रसाद केंजळे आणि प्रा रवींद्र जगताप यांचे व्याख्यान पार पडले
COMMENTS