सुपे काळखैरवाडी - राजबाग येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
सुपे काळखैरवाडी - राजबाग येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह

मोरगांव : प्रतिनिधी

काळखैरेवाडी (राजबाग)  ता .बारामती येथील  एका  महीलेचा रिपोर्ट   कोरोना पॅझीटीव आला  असुन गेल्या ३ दिवसापासून मोरगांव येथील खाजगी दवाखान्यात सदर महीला उपचार घेत होती . यामुळे लोकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता  असल्याचे आरोग्य खात्याकडून आवाहन केले आहे .
        काळखैरेवाडी गावच्या हद्दीत  राजबाग ता . बारामती येथील महीला गेल्या दोन - तीन दिवसापासून  मोरगांव ता . बारामती येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत होती . प्रथम निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले होते . मात्र प्रकृती आणखी ढासळल्याने कोरोना तपासणीसाठी बारामती येथील शासकीय रुग्णालय पाठवले होते . आज सदर महीलेचा  रिपोर्ट पॅझीटीव  आला आहे .
        यामुळे मोरगांव  परीसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन येथील वैद्यकीय अधीकारी अनिल वाघमारे यांनी केले आहे . तसेच ग्रामस्थांनी  आवश्यक असेल तरच बाहेर पडावे व सोशल डिस्टन्स पाळावे असे सरपंच निलेश केदारी यांनी सांगितले आहे .
To Top