‘दिलखुलास’ मध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची
‘कोरोना : प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व’ या विषयावर मुलाखत
मुंबई दि.13 :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या ‘कोरोनाशी दोन हात’ या संवादातील पाचवा भाग प्रसारित होणार आहे. ‘कोरोना: प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व’ या विषयावरील ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर व न्यूज ऑन एअर या ॲपवर सोमवार दिनांक 14 व मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकता येईल. ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथ्था यांनी ही मुलाखत घेतली आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने काय उपाय करावेत, कोरोनाशी लढण्यासाठी इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन, आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचना, तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे, याचबरोबर शरीरासह मनानेही सुदृढ राहिलो तर माणूस कशा प्रकारे संकटावर मात करू शकतो अशा महत्वाच्या मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘दिलखुलास’ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
COMMENTS