घर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिया मुळे साथ सोडली...नवऱ्यानंतर एकुलत्या एक मुलाचाच आधार.. तो ही आता मृत्यूशी झुंज देत आहे. उत्पादनाची बाजू शून्य...दवाखाण्यासाठी एक रुपयाही जवळ नाही...जे काय जवळ आहे ते फक्त तीन खनाचं घर... घर विका पण माझ्या लेकराला वाचावा असा टाहो आईने फोडला आहे.
मुरूम ता बारामती येथील नितीन बनकर हा गेली दोन महिने निमोनिया आजराशी झुंज देत आहे. खर्च झेपत नसल्याने या माउलीने ही आर्त साद घातली, मागील दोन महिन्या पूर्वी याच आजारात नवरा गमावल्याने आता एकमेव पोरगं च आयुष्याचं आधार राहिला आहे आणि तोच नसेल तर काय घराला करायचं. नितीन बनकर याच्या दोन महिन्यांपूर्वी छाती मध्ये संसर्ग तयार झाल्याने गंभीर आजारी पडला त्या वेळी मित्रांनी प्रयत्नांची शिकस्त करून आर्थिक मदत उभी केली व नितीन ला जीवदान दिले. पण नियतीला हे मान्य नव्हते पुन्हा परत त्याच गंभीर आजाराने तो ग्रस्त झाला आहे. सध्या त्याच्या वर सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर आय सी यु हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत पण पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. मागील वेळी मित्रांनी मोठी आर्थिक मदत उभी केली पण आता त्यांचेही हात टेकले आहेत. दुसरा कोणताही आर्थिक आधार नसल्यामुळे त्याच्या आईने तीन खणाचे राहते घर विका पण नितीन ला वाचवा असा सल्ला मित्रांना दिला.
दोन महिन्यांपूर्वी मुरूम ता बारामती येथील स्थायिक असलेला आणि चालक म्हणून नोकरी करणारा जॅक्सनला त्रास जाणवू लागतो. त्याला कोरोना असेल म्हणून बारामती येथे त्याची कोरोना टेस्ट घेतली जाते. तो निगेटीव्ह येतो, मात्र जॅक्सन ला निमोनिया झाला होता. बारामती मधील एका ही डॉक्टर ने त्याला ऍडमिट करून घेतले नाही. आरोग्य सभापती प्रमोद काकडे आणि आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमने यांच्या मध्यस्थीने त्याला बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली मध्ये ऍडमिट केले जाते. मात्र जॅक्सन ची परिस्थिती खालावत चालल्याने त्याला पुण्याला ससून ला हलवावे असे डॉक्तरांनी सुचवले.
जॅक्सन ने पण आयुष्यात मित्रांची फौज उभी केली होती. जॅक्सन ला ससून ला घेऊन जाणे म्हणजे आपला मित्र गमवणे, असे मित्रांना वाटले. आणि तिथून सुरू होते जॅक्सन ला जगावण्याची धडपड... जॅक्सन ला मुंबई, पुणे, बारामती कुठेच नेयचे नाही. जॅक्सन वर सोमेश्वरनगर मध्येच उपचार करायचे. वाघळवाडी येथील सोमेश्वर आयसीयु चे डॉ अनिल कदम आणि व्यवस्थापक ऋषी गायकवाड यांच्याशी चर्चा होते. जॅक्सन च्या छातीत पाणी झाले होते. घरची परिस्थिती हालाकीची...ऑपरेशनला दोन लाखाच्या आसपास खर्च...तरीही मित्रांनी हार नाही मानली. ऑपरेशन करायचं ठरवलं. आणि दुसरीकडे एकच धावपळ मित्राच्या ऑपरेशन साठी पैसे गोळा करण्याची...व्हाट्स अप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर मदतीचे मेसेज पडू लागले. यासाठी त्याचे मित्र पुढाकार घेतात. याला मित्रांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. आज अखेर दीड लाखाच्या वर रक्कम जमा झाली आहे. जॅक्सन चं ऑपरेशन यशस्वी झालं आहे. हजारो मित्रांमधून निघून चाललेल्या जॅक्सन मित्रांनी जॅक्सन ला वाचवले.
आता पुन्हा जॅक्सन ला तोच त्रास जाणवू लागल्याने त्याला आठ दिवसापूर्वी ऍडमिट केले आहे. याठिकाणी त्याचे दोन लाख बिल झाले आहे. तर डॉकरांनी त्याला पुण्याला हलवायला सांगितले आहे. मित्रांचे पुण्यातील केईएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी बोलणे झाले असून त्या ठिकाणी दोन लाखाचा खर्च येणार आहे. आता मित्रांपुढे चार लाखाची एवढी मोठी रक्कम कशी उभारणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
नीतीन (जॅक्सन) या आजारातून बरा होऊ शकतो हा विश्वास पुण्यातील डॉक्टरांनी दिल्या मुळे कितीही आर्थिक अडचण असली तरी त्याचा उपचार करायचाच असा निर्धार त्याच्या मित्रांनी केला आहे. त्या साठी समाजातील काही दानशूर लोकांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.