'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' या योजने अंतर्गत मंगळवारी निंबुत गावामध्ये होणार कोरोना तपासणी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या संकटामध्ये निबुत गावामध्ये कोरोना रोगाचा वाढता शिरकाव पाहता मंगळवार दि. २९ रोजी माझे कुटूंब माझी जबाबदारी या शासकिय योजने अंतर्गत संपुर्ण नियुत गाव व वाड्यावस्त्यां मधील सर्व १३०० कुटूंबांची कोरोना तपासणी होणार आहे. या कोरोना तपासणीचे आयोजन जिल्हा परिषद आरोग्य विभाग, निंबुत ग्रामपंचायत व सतिशभैय्या कल्याणकारी संघ यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.
त्यासाठी तपासणी सर्वेतील कर्मचारी यांना मार्गदर्शन, ट्रेनिंग व तपासणी साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सतिशराव काकडे हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोदकाका काकडे, सोमेश्वर कारखान्याचे मा.चेअरमन शहाजीकाका काकडे, तहसिलदार विजय पाटील, विस्तार अधिकारी डी. डी खंडाळे, संपर्क अधिकारी बोरावके सरपंच राजकुमार बनसोडे व ग्रामसेवक डी.जी बालगुडे हे उपस्थित होते तसेच सर्वेतील कर्मचारी यांना
मार्गदर्शन व ट्रेनिंग गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायतीच्या
माध्यमातुन सर्वेतील कर्मचाऱ्यांना ऑक्सिमिटर, थर्मल गण, फेस शिल्ड, हॅन्ड ग्लेज, सॅनिटायझर, मास्क यांचे।वाटप करण्यात आले. तसेच निबुत गावठाण व वाड्यावस्त्यांवरील सर्व ग्रामस्थांना तपासणी माहिती
देण्यासाठी सोमवारी स्पिकर गाड्यांमधुन माहिती देण्यात येणार आहे. तसेच पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या मार्फत गावातील सर्व ग्रामस्थांना कोरोना विषाणुपासुन रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गोळयांचे वाटप तसेच ज्युबिलीयंट कंपनीच्या माध्यमातुन गावातील प्रत्येक कुटूंबास १०० ML. सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले होते त्याचाही आढावा यावेळी घेण्यात आला. मंगळवारी सर्वेतील कर्मचारी यांनी ग्रामस्थांची तपासणी केल्यानंतर संशयित रूग्णांना आरोग्य उपकेंद्र निंबुत येथे कोरोनाच्या स्वाईप तपासणीसाठी नेहण्यात येणार आहे त्यासाठी २ गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना तपासणी पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांस लगेच बारामती येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी सर्वे करणाऱ्या कर्मचारी यांना सकाळी नाष्टा व दुपारी जेवनाची व्यवस्था ग्रामपंचायत निंबुत यांच्या वतीने व सतिशभैय्या कल्याणकारी संघाच्या मार्फत करण्यात येणार आहे. तरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, निबुत ग्रामपंचायत व सतिशभैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत व वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना विनंती करण्यात येते की मंगळवार दि.२९/९/२०२० रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत कुटूंबातील व्यक्तींनी कामासाठी अथवा इतर कोणत्याही कारणांसाठी
घरातुन बाहेर जावु नये. आरोग्य तपासणी कर्मचारी आपल्या घरी येवुन सर्वे करणार आहेत तरी आपल्या।कुटूंबाची जबाबदारी आपलीच असल्याने ग्रामपंचायतीस व आरोग्य विभागास सहकार्य करावे,
COMMENTS