शरीर सुखाची मागणी धुडकावल्याने दिराने केला भावजयीचा खून : पुरंदर तालुक्यातील घटना
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे रिसे गावातील एका व्यक्तीने आपल्या भावजयीला शरिरसुखाची मागणी केली, ही मागणी धुडकवल्याने तीचा खून केल्याची घटना घडली आहे. खुन केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. या बाबतची तक्रार खून झालेल्या व्यक्तीची मुलगी हसीना नासीर मुलाणी हीने जेजुरी पोलिस स्टेशनला दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रिसे येथील मुबारक कादर सय्यद हा त्याची भावजयी शबीरा जैनुद्दीन सय्यद (वय ४५) हिचयाकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता. परंतु ती त्यास तयार होत नसे. असे वारंवा घडत ती अशा अनैतिक संबंधास तयार नसल्याने सोमवार दि. २१/९/२०२० रोजी रात्रीचे जेवण झाल्यानंतर शबीरा घराबाहेर खरकटी भांडी घासत असताना मुबारक कादर सय्यद याने घराची बाहेरची कडी लावून शबीराकडे गेला. त्यावेळी घरातून शिबिराची मुलगी हसीना व घरातील लोकांनी मुबारकला तू काय करत आहेस? दरवाजा उघड म्हणून समजवले परंतु त्याने दरवाजा उघडला नाही. शबीराकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यास तिने नकार दिल्याने मुबारक कादर सय्यद याने चिढून हातातील सुरीने शबीराच्या छातीवर, डाव्या हाताच्या मनगटावर, डाव्या पायाच्या मांडीवर, डाव्या पायाच्या घोट्यावर वार करुन तिचा खून केला. याबाबत शबीराची मुलगी हसीना मुलाणी हीने जेजुरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
जेजुरी पोलिसांनी भा.द.वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी पुरंदर भोर यांचे मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे करत आहेत. आरोपी मुबारक कादर सय्यद हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी वेगवेगळी दोन पथके रावणा झाली असल्याची माहिती जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे.
COMMENTS