नियमांचे उल्लंघन : कोऱ्हाळेत तीन दुकांदारांवर गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
नियमांचे उल्लंघन : कोऱ्हाळेत तीन दुकांदारांवर गुन्हा दाखल

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथे आज तीन किराणा दुकानदारांवर सोशल डिस्टनसिंगचे पालन न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे पंकज विजयकुमार दोशी वय ३४  अभिजित प्रकाशलाल दोशी वय ३६ शीतल शांतीलाल दोशी वय ४२ या तिघांनी आपले मालकिचे किराणा दुकान उगडुन तेथे लोकांची गर्दी करुन मानवी जिवीतास व वैयक्तीक सुरक्षिततेस धोका निर्माण होवुन धोकादायक रोगाचा संसर्ग पसरविल याची जाणीव असताना व त्याच्या या हयगईच्या व घातकी कृतीमुळे इतरांचे मानवी जिवीत धोक्यात येईल याची जाणीव असताना  सोशल डिस्टींगचे पालन नकरता किराणा दुकान  चालु करुन त्या द्वारे किराणा माल विक्री करीत असताना मिळुन आला आहे तसेच त्याने महाराष्ठ्र शासनाचे आदेश जा क्र  DZ-dum/2020cr92/dism-1,dated 2 may 2020 या आदेशाची आवज्ञा करीत आसताना मिळुन आले आहे. त्याचे विरुद्ध भाद वि कलम २६९,२७०,१८८,तसेच राष्र्टीय आपत्ती कायदा कलम ५१ ब तसेच महाराष्र्ट कोविड उपाय योजना नियम २०२ च कलम ११ , साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम २,३,४ प्रमाणे पो शि नितीन उत्तम साळवे यांनी फिर्याद दिली आहे.
To Top