पुरंदरच्या माजी उपसभापतींची ७७ वर्षी कोरोनावर मात

Admin
पुरंदरच्या माजी उपसभापतींची ७७ वर्षी कोरोनावर मात

नीरा प्रतिनिधी

पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव (दादा) चव्हाण यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी कोरोनावर मात केली. त्यांचे मंगळवारी ( दि.१) संध्याकाळी नीरा येथे आगमण झाल्यानंतर ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
                 पुरंदरचे माजी उपसभापती लक्ष्मणराव(दादा) चव्हाण यांचा बुधवारी (दि.२६) कोरोणा तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुणे येथील खाजगी हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अवघ्या सात दिवसांत वयाच्या ७७ व्या वर्षी लक्ष्मणदादा चव्हाण यांनी कोरोनावर मात केली. नीरा येथे मंगळवारी (दि.१) संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास आगमन झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर  नीरेचे पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, राजकुमार शहा, मत्तल चव्हाण, विजय पवार, अल्ताफ सय्यद, संजय भंडारी, दिलीप शहा, प्रल्हाद भंडारी , 
प्रदिप खाटपे,धर्मेंद्र येवले,  प्रविण भोईटे, शातिकुमार कोठडिया, धिरेंद्र रावळ,  सचिन ठोंबरे  यांनी स्वागत केले. या प्रसंगी जि.प.चे.माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण, अनिल चव्हाण, दयानंद चव्हाण उपस्थित होते.
                    यावेळी बोलताना लक्ष्मणराव (दादा)
चव्हाण म्हणाले कि, माझा गेल्या आठ दिवसांपासून कोरोना बाबतीत वेगळा अनुभव आहे. नीरा गावावरील कोरोनाचे संकट टाळण्यासाठी ग्रामस्थांनी,व्यापाऱ्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पणे पालन करून नीरा गावाचे नावलौकिक करावे.तसेच प्रशासनास सहकार्य करावे. येत्या १५ सप्टेंबर पासून मी स्वतः कोरोनाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

To Top