बारामतीच्या या कोरोना योद्ध्या पुन्हा कोरोनाच्या रणांगणात लढा देण्यास सज्ज
पुरंदर : प्रतिनिधी
बारामतीच्या कोरोना योद्ध्या कोरोनावर मात करत निरेतील घरी परतलेल्या. त्यांचे पती गेली १६ दिवस त्यांना नीरेतील एक फ्लॅटमध्ये होम आयशुलेशन द्वारे उपचार देत होते. रविवारी या दोघांचे त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांचे मित्र, सहकारी, व शेजाऱ्यांनी त्यांना गुलाबपुष्प देऊन टाळल्या वाजवत स्वागत केले. बारामतीच्या या कोरोना योद्ध्या पुन्हा कोरोनाच्या रणांगणात लढा देण्यास सज्ज झाल्या आहेत.
बारामतीच्या आरोग्य विभागात (एन.आर. एच.एम) कार्यरत असलेल्या व मुळच्या निरा-पिंपरे येथील रहिवासी असलेल्या ज्योती गणेश जाधव रविवारी आपल्या घरी सुखरूप परत आल्या. त्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बाप्पू भंडलकर, भाऊ चव्हाण, शेजारी (तलाठी) बाप्पूसाहेब देवकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, सदस्य भरत निगडे, उपस्थीत होते.
ज्योती जाधव या बारामती शहरात राष्ट्रीय आरोग्या अभियाना अंतर्गत आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत असल्याने त्यांना सर्वे करणे क्रमप्राप्त होते. त्याच दरम्यान त्यांच्या सह त्यांच्या सोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे पती गणेश जाधव ही निरा आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक असल्याने त्यांनी वेळीच काळजी घेत होम आयशुलेशन द्वारे उपचार सुरू केले. ते स्वत: या काळात आपल्या पत्नी सोबत होते. गणेश जाधव यांनाही गेली १६ दिवस होम कॉरंटाइन रहावे लागले. पण त्यांनी वर्क फ्रॉम होम चालूच ठेवले होते.
आरोग्यसेवा हीच ईश्र्वर सेवा हाणून हे दांपत्य परिसरातील लोकांना सेवा देत असते. कुठल्या पद्धतीचा आजार झाल्यास डॉक्टरांनंतर यांचा सल्ला लोक आवर्जून घेतात. कमी खर्चात चांगली आरोग्या यंत्रणा कुठे राबवली जाते, शासनाच्या आरोग्य विषयी कोणत्या योजना राबवल्या जातात, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान आरोग्य सहाय कसे मिळेल या विषयी हे जावध सांगत असतात. जाधव दांपत्य पुढील काही दिवसांत पुन्हा आपल्या आरोग्य सेवत रुजू होऊन लोकांना आरोग्य व कोरोना संदर्भात जनजागृती करणार असल्याचे ते त्यांनी सोमेश्वर रिपोर्टर पोर्टलशी बोलताना सांगितले.
COMMENTS