घाबरून जाऊ नये, स्वतःची काळजी घ्या,
प्रशासनाला सहकार्य करा : डॉ मनोज खोमणे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सर्व बारामतीकरांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे आपण काळजी घेणे अत्यावश्यक आहे तसेच जे रुग्ण पॉझिटिव्हआलेले आहेत व जे त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोणीही घाबरून न जाता आपल्या ठिकाणी क्वारंटाईन व्हावे आपणाला प्रशासनामार्फत संपर्क साधला जाईल व पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल कृपया तुम्ही घाबरून जाऊ नये व स्वतःची काळजी घ्यावी तसेच लक्षण विरहित रुग्णांनी ॲडमिट होण्यासाठी घाई करू नये सर्वांना संपर्क साधला जाईल व योग्य ते मार्गदर्शन केले जाईल कृपया प्रशासनास सहकार्य करावे तसेच अजूनही काही लोक मास्क वापरत नाहीत त्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे व सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे व सर्व कामावर जाणाऱ्या तरुणांना विनंती आहे की आपण कामावरून घरी आल्यानंतर आपल्या ज्येष्ठ आई-वडील, आजी-आजोबा यांपासून सुरक्षित अंतरावर राहावे व त्यांच्याशी बोलताना घरांमध्ये सुद्धा मास्क वापरावे ज्यामुळे त्यांना होणारा कोरोणा प्रादुर्भाव टाळता येईल.
COMMENTS