ग्रामसेवकांचे सर्व आरोप बिनबुडाचे : सदस्य ठेकेदार असल्याचे लेखी पुरावे द्यावेत

सोमेश्वर रिपोर्टर live
ग्रामसेवकांचे सर्व आरोप बिनबुडाचे : सदस्य ठेकेदार असल्याचे लेखी पुरावे द्यावेत

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

वाणेवाडीचे ग्रामसेवक यांच्या विरुद्ध १२ सदस्यांनीच आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी मागणी केली आहे. स्वतःची गैरकामे लपवण्यासाठी ग्रामसेवक सदस्यांवर बिनबुडाचे आरोप करत असल्याचे वाणेवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले आहे. 
            गावातील सर्व विकासकामे ग्रामपंचायत मार्फत सुरू असून सदर कामे दर्जेदार असून त्याची पाहणी संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीचा कोणताही सदस्य हा ठेकेदार नसून याबाबत ग्रामसेवकांनी लेखी पुरावे द्यावेत. उलट गावातील तरुणांची दिशाभूल करून व चुकीची माहिती देऊन गावामध्ये वाद निर्माण करत आहेत. आम्ही सदस्यांनी ग्रामसेवकांच्या बदलीची व गैरकारभारविरुद्ध चौकशीची मागणी केली आहे. ते सदस्यांवर दिशाहीन आरोप करत असून त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यकार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकरी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे
To Top