केंद्रीय मंत्री रामदास आठवले अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी उद्या २२ ला बारामतीत
बारामती : प्रतिनिधी
बारामती- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले हे हे गुरुवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी बारामती येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची ची पाहणी करण्यासाठी बारामती तालुका दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती जिल्हा सचिव सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विजय डँडी सोनवणे, तालुका अध्यक्ष मधुकर मोरे, शहराध्यक्ष अभिजित कांबळे, जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनवणे, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष रत्नप्रभा साबळे, शहराध्यक्ष पुनम घाडगे, संजय वाघमारे, निलेश जाधव यांनी दिली.
तालुक्यातील क-हावागज, पंचशील नगर नगर भागाला भेट देणार आहेत, त्यानंतर ते पत्रकारांना भेटणार आहेत. प्रामुख्याने परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीने बारामती व परिसराला प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन बारामतीकरांचे अतोनात हाल झालेले आहेत तसेच शेतकऱ्यांची प्रचंड मोठी नुकसान व समस्त लोकांचे अतोनात हाल झालेले असल्याने केंद्रीय मंत्री बारामती तालुक्यावर येत आहेत अशी माहितीरिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी दिली पाहणीनंतर नामदार आठवले हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
COMMENTS