वाणेवाडी आणि मुरूम येथील २२०० कुटुंबाची होणार तपासणी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे शुक्रवार दि ९ रोजी १०९५ कुटुंबाची तर मुरूम येथील शनिवार दि १० रोजी ११०५ कुटुंबाची ' माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अंतर्गत कोविड तपासणी करण्यात येणार आहे.
याबाबत नुकतीच मुरूम ता बारामती येथे अजयश्री मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जि प चे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, बारामतीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्यासह सर्व सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.
दि ९ रोजी वानेवाडी तील १०९५ कुटुंबाची तपासणी एकाच दिवसात करण्यात येणार असून यामध्ये वाणेवाडी गावठाण, दत्तवाडी, चव्हानवाडी, रामनगर, विकासनगर आणि मळशी याठिकाणी ही तपासणी करण्यात येणार आहे. तर मुरूम गावातील ११०५ कुटुंबाची तपासणी करण्यात येणार असून यामध्ये सळोबावस्ती, शिंदेवस्ती, बुणगेवस्ती, भंडलकरवस्ती, कुरणवस्ती, म्हतोबामाळ, लांडगोबामाळ आणि गावठाण याठिकाणी ही तपासणी होणार आहे
COMMENTS