'सोमेश्वर' चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालयाला देणगी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कोऱ्हाळे येथील कै नारायणराव भगत वाचनालायला पाच हजाराची देणगी देण्यात आली. अध्यक्ष जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखान्याचे पेट्रोल पंप कर्मचारी व खातेप्रमुख यांच्या वतीने ही देणगी देण्यात आली.
कै नारायणराव भगत वाचनालयाचे अध्यक्ष सुनील भगत यांच्याकडे ही देणगी सुपूर्त करण्यात आली. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक लक्ष्मण गोफणे, कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे आदी उपस्थित होते.
COMMENTS