मुरूम येथील तलवार हल्ला प्रकरणी तीन जण ताब्यात

Admin
मुरूम येथील तलवार हल्ला प्रकरणी तीन जण ताब्यात

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मुरूम येथे जनावरांच्या आर्थिक व्यवहारावरून १५ जणांनी  कुटुंबावर तलवारी आणि रॉड ने हल्ला केला. यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
             याबाबत सविस्तर हकीकत अशी, मुरूम येथील वाहिद इनामदार हे गायींचा घेवाण देवाण चा व्यवहार करत होते. फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील अमर बोडरे याला इनामदार हे पैसे देणे लागत होते. यापैशावरून आज सकाळी मुरूम येथे वाहिद इनामदार व अमर बोडरे यांच्यात बाचाबाची झाली. बोडरे हा साखरवाडीला गेला आणि १४ ते १५ जणांना मुरूम येथे घेऊन आला. त्यांच्याकडे असलेल्या तलवारी आणि लोखंडी रॉड ने त्यांनी संपूर्ण इनामदार कुटुंबावरच हल्ला केला. यामध्ये  वाहिद अब्दुलकरीम इनामदार, फिरोज अब्दुलकरीम इनामदार, अब्दुलकरीम मुबारक इनामदार, फारुख शब्बीर इनामदार, जहाँगीर दिलावर इनामदार, मोईन राजू इनामदार आणि वाहिद यांची पत्नी परवीन वाहिद इनामदार हे ७ जण जखमी झाले आहेत. 
          घटनेची माहिती समजताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक शेलार, साळुंखे आणि पोलीस स्टाफ तातडीने घटनास्थळी दाखल झाला. तत्पूर्वी जखमींना पुरंदर तालुक्यातील निरा येथील लकडे हॉस्पिटल तर खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील रेणुका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. साखरवाडी येथील आरोपींचा शोध सुरू असून
 पोलिसांनी  संजय किसन गरडकर  रा. साखरवाडी
 संभाजी महादेव खोमणे रा. मुरुम आणि  ज्ञानेश्वर वसंत बोडरे  रा. पाचसर्कल साखरवाडी या तिघांना ताब्यात घेतले असून यांच्या मार्फत पुढील आरोपींचा शोध सुरू आहे.
To Top