मुरूम येथील हल्ला प्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल : वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर तलवार आणि लोखंडी रॉड ने हल्ला करून सात जणांना जखमी केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वाहिद अब्दुलकरीम इनामदार वय ३५ रा.मुरूम ता.बारामती जि.पुणे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलीसांनी
अमर बोडरे, शंकर बोडरे, मुन्ना बोडरे, सुरज वसंत बोडरे, ज्ञानेष्वर वसंत बोडरे, करण बोडरे, अक्षय बोडरे, संजय किसन गरडकर यांसह अनोळखी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुरूम ता.बारामती जि.पुणे गावचे हद्दीत फिर्यादीचे घराचे समोर अमर बोडरे,शंकर बोडरे, मुन्ना बोडरे, सुरज वसंत बोडरे, ज्ञानेश्वर वसंत बोडरे, करण बोडरे, अक्षय बोडरे, संजय किसन गरडकर हे व मोटार सायकल वरील इतर ७ अनोळखी लोक अंदाजे वय २० ते २५ वयाचे त्यांचेकडील ७ मोटार सायकलवरून येऊन बेकायदेशीर जमाव जमवुन गाईच्या व्यवहारतील पैसे देण्याचे कारणावरून फिर्यादीचा भाऊ फिरोज यास शंकर बोडरे याने त्याचे हातातील लोंखडी राँडने डोक्याचे उजवे बाजुला मारहाण केली. व त्याचे सोबत असलेल्या करण बोडरे व इतर ७ अनोळखी लोकांनी त्यांच्या हातात असलेल्या प्लाँस्टीकच्या दांडयाने त्याच्या हाता, पायावर, पाठीवर मारहाण केली त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीचे वडील भाऊ फिरोज यास सोडविण्यासाठी गेलो असता अमर बोडरे व सुरज बोडरे यांनी फिर्यादीचे वडीलांचे पोटावर उजवे बाजुस खांदयावर,पाठीवर,तलवारीने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व अमर बोडरे याने ‘‘ तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणुन त्याचे हातातील तलवारीने फिर्यादीचे डोक्यात वार केला. व त्यावेळी फिर्यादीचे भावकीतील जहांगीर दिलावर इनामदार, फारूक शब्बींर इनामदार, मोईन राजुभाई इनामदार, अरबाज ताजुद्दीन इनामदार, शहाजान खुदबुद्दीन इनामदार, पत्नी परवीन वाहिद इनामदार हे सोडविण्यासाठी आले त्यावेळी ज्ञानेश्वर वसंत बोडरे याने त्याच्या हातातील तलवारीने जहांगीर दिलावर इनामदार, यांचे उजवे खांदयावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केलेले आहे. व फारूक शब्बींर इनामदार, मोईन राजुभाई इनामदार, अरबाज ताजुद्दीन इनामदार, शहाजान खुदबुद्दीन इनामदार, पत्नी परवीन वाहिद इनामदार,यांना अमर बोडरे,शंकर बोडरे,मुन्ना बोडरे,सुरज वसंत बोडरे,करण बोडरे,अक्षय बोडरे,संजय किसन गरडकर तसेच इतर ७ अनोळखी इसम यांनी त्यांचे हातातील तलवार, लोखंडी राँड व प्लॅस्टीकचे फावडयाच्या दांडयाने त्यांचे खांदयावर,पायावर,हातावर,पाठीवर,कानावर,जबर मारहाण करून जखमी केलेले आहे.