'सोमेश्वर' कारखान्यात १ लाख साखर पोत्याचे पूजन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात १ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन संचालक मंडळाच्या हस्ते पार पडले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, संचालक किशोर भोसले, महेश काकडे, विशाल गायकवाड, लालासाहेब माळशिकारे, हिराबाई वायाळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष जगताप म्हणाले, सोमेश्वर कारखान्याने १ लाख ७ हजार मेट्रिक टनाचे गाळप केले असून १ लाख १ हजार पोत्याचे उत्पादन घेतले आहे. या गाळप होणाऱ्या उसामधून आपनास उच्च दर्जाची साखर मिळत आहे. चालू गळीत हंगामात सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १३ लाख टनांच्या आसपास गाळपासाठी ऊस उपलब्ध असून सभासदांचा सर्व ऊस वेळेत गाळप करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर भोसले यांनी केले आभार शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड यांनी केले.