सुप्यातील रक्तदान शिबीरात ७८ बाटल्या संकलीत
सुपे : प्रतिनिधी
दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ७८ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.
कोराना महामारीच्या या विषाणूने साऱ्या जगात थैमान घातले आहे. तर त्याचा वाढत्या प्रमाणाने शासकीय रूग्णालयासह अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या पार्श्वभुमीवर सुपे येथील माजी तंटामुक्त अध्यक्ष अनिल हिरवे यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे येथील गरिबांचे रूग्णालय समझले जाणारे ससुन हॉस्पिटल यांची शासकीय रक्तपेढी यावेळी निमंत्रित करण्यात आली होती. येथील अनिल हिरवे मित्र मंडळाच्यावतीने युवकांना प्रेरित करुन सुमारे ७८ युवकांनी सामाजिक बांधिलकी दाखवत रक्तदान केले. यावेळी ससुन हॉस्पिटलच्या डॉ. देसले यांनी या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मंडळाचे कौतुक केले. तसेच या शिबीरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात आले. तर रक्तदान करणाऱ्यांना दोन वर्षांसाठी ससुन सह इतर शासकीय रूग्णालयाच्या ठिकाणी गरजेनुसार मोफत रक्त मिळणार असल्याची माहिती डॉ. देसले यांनी दिली. तसेच यावेळी कोरोना काळात सुपे गावात कोरोना योध्दाचे कार्य करणाऱ्या सुपे ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी, पोलीस अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचा कोरोना योध्दा म्हणुन पुणे राष्ट्रवादी पदवीधर संघ प्रतिनिधी सुयश जगताप यांच्या संकल्पनेतुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, सरपंच स्वाती हिरवे, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अशोक लोणकर, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य मल्हारी खैरे, मुनीर डफेदार, अशोक सकट, गणेश जाधव, सदस्या सुमन जगताप, राजश्री धुमाळ, रेखा चांदगुडे, मा. तंटामुक्ती अध्यक्ष अनिल हिरवे, राष्ट्रवादी पदवीधर प्रतिनिधी सुयश जगताप, महेश चांदगुडे, महाराष्ट्र शासन प्राद्रेशिक रक्तपेढीचे कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
...............................
COMMENTS