सुपे-लोणीभापकर रस्त्यावरील अपघातात एक ठार
सुपे : प्रतिनिधी
दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे लोणीभापकर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रक्टर ट्रॉयलीला धडकुन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी ( दि. ०८ ) रात्री पानसरेवाडी हद्दीतील तांबवस्तीनजीक घडली. यासंदर्भात ट्रक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय वामन शेंडगे ( रा. काळखैरेवाडी, वय ४५ ) असे मृत्यु झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय दत्तात्रय शेंडगे ( रा. काळखैरेवाडी वय २३ ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,
पानसरे गावचे हद्दीतील तांबेवस्ती नजीक असणाऱ्या पाण्याचे टाकीजवळ सुपा लोणीभापकर रस्त्यावर ट्रँक्टर क्रमांक एम. एच. १७ ए. व्ही. ८६७५ व त्यांस जोडलेल्या विना नंबरच्या दोन ट्राँयल्या ट्रँक्टर चालकाने रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. त्यामुळे या रस्त्यावरुन जा - ये करणाऱ्या वाहनांना अडथळा होईल अशा धोकादायक स्थितीत रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. त्यामुळे फिर्यादीचे वडील रविवारी रात्री सात वाजता सुपा बाजुकडुन लोणीभापकर बाजुकडे रस्त्याने दुचाकी ( एम. एच. ४२ ए. यु. १४२८ ) वरुन जात असताना ऊसाने भरलेल्या ट्रक्टरच्या ट्रॉयलीस धडकुन अपघात झाला. या वडीलांच्या अपघातात ट्रक्टर चालक मृत्युस कारणीभुत झाल्याची माहिती अक्षय याने पोलिसांना दिली. त्यानुसार अज्ञात ट्रक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस हवालदार बी. आर. मत्रे करीत आहेत.
..............................................
COMMENTS