सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

'सोमेश्वर' ने वार्षिक सभेची परवानगी न घेता विस्तारीकरण, आणि १२ कोटींची भांडवली कामे : दोन सभासदांची साखर आयुक्तांकडे धाव

'सोमेश्वर' ने वार्षिक सभेची परवानगी न घेता विस्तारीकरण, आणि १२ कोटींची भांडवली कामे : दोन सभासदांची साखर आयुक्तांकडे धाव

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने वार्षिक सर्वसाधारण सभेत परवानगी न घेता विस्तारीकरण करणे आणि साखर आयुक्तांची परवानगीशिवाय १२ कोटींची भांडवली कामास मंजुरी देणे यामुद्यांवर सोमेश्वर कारखान्याचा दोन सभासदांनी साखर आयुक्तांकडे धाव घेतली आहे. यावर  वरील मुदयांबाबत चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल  सादर करण्याचे आदेश साखर संचालक (अर्थ) यांनी प्रादेशिक सहसंचालकांना दिले आहेत. 
             सोमेश्वर कारखान्याचे सभासद बाळकृष्ण शिवराम राउत व राहुल उत्तमराव जगताप यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे,  श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०२०/२१ विस्तारीकरणास वार्षिक सभेची परवानगी नसताना संचालक मंडळ चूकीचे काम करत असलेने
त्यास प्रशासकीय, आर्थिक मान्यता  देऊ नये. तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०२०/२१ सालात भांडवली खर्चाची १२ कोटी रुपयांची कामे साखर आयुक्त कार्यालयाची मंजूरी न घेता
करत असल्याने त्याची चौकशी करावी असे म्हटले आहे. 
            बाळकृष्ण शिवराम राउत व  राहुल उत्तमराव जगताप यांचा दि. ९/१०/२०२० व दि. २२/१०/२०२० रोजी याबाबत साखर आयुक्तांना अर्ज दिला होता. यामध्ये श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०२०/२१ विस्तारीकरणास वार्षिक सभेची परवानगी नसताना संचालक मंडळ चूकीचे काम करत असलेने त्यास प्रशासकीय , आर्थिक मान्यता न देणेबाबत नमुद केलेले आहे.  कारखान्याने सन २०१८/१९ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ११२ कोटीची सहविजनिर्मितीसह विस्तारवाढ करणेकरीता मंजुरी मिळवली होती. त्यावर गेली २ वर्षामध्ये कोणतेही कामे न करता सदर कामे स्थगित केली. सदर ११२ कोटी कोजनसह विस्तारीकरणाचे वेगवेगळे नियम, रचना असताना २ वर्षांनी वेगळा ८५ कोटी रुपयांचा DPR (नियोजीत प्रकल्प अहवाल) तयार करून मागील मान्यता ही एकच वर्षासाठी ग्राहय धरली जाते. त्यामुळे मागील ठरावाचा आधार
घेवून प्रशासकीय , आर्थिक मान्यता देण्यात येउ नये. ११२ कोटीच्या DPR मधील मशनरी व संचालक मंडळाने तयार केलेल्या DPR मधील मशनरी वेगवेगळी आहे. संपुर्ण DPR वेगळा आहे. या स्वरूपाचे गंभिर आरोप कारखान्यावर केलेले आहेत.
अर्ज क्रमांक २ अन्वये अर्जदारांनी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात सन २०२०/२१ या वर्षात सुमारे १२ कोटी रुपयांची भांडवली खर्चाची कामे कारखान्यात चालू आहेत. सदर कामांसाठी  साखर आयुक्त कार्यालयाची कोणतीही प्रशासकीय मान्यात घेण्यात आलेली नाही. एकाच कंपनीला वेगवेगळया नावाने सदर कामे तोडून देण्यात आलेली आहेत. सदर कामाची मान्यता न घेता कामाचे तुकडे करून एकाच व्यक्तीला सदर कामे दिली आहेत, असे गंभिर स्वरुपांचे आरोप करून याची तात्काळ चौकशी करून कामांचे ऑडीट व्हावे व दोषींवर कारवाई व्हावी, असे तक्रारदारांनी अर्जात म्हटले आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7051,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : 'सोमेश्वर' ने वार्षिक सभेची परवानगी न घेता विस्तारीकरण, आणि १२ कोटींची भांडवली कामे : दोन सभासदांची साखर आयुक्तांकडे धाव
'सोमेश्वर' ने वार्षिक सभेची परवानगी न घेता विस्तारीकरण, आणि १२ कोटींची भांडवली कामे : दोन सभासदांची साखर आयुक्तांकडे धाव
https://lh3.googleusercontent.com/-Vbusbd6eo5c/X6pSLZI5kRI/AAAAAAAAFk8/bLf-DgrrtDoYFg4kMQ3oli_ICeuRm4e3wCLcBGAsYHQ/s1600/1604997619632595-0.png
https://lh3.googleusercontent.com/-Vbusbd6eo5c/X6pSLZI5kRI/AAAAAAAAFk8/bLf-DgrrtDoYFg4kMQ3oli_ICeuRm4e3wCLcBGAsYHQ/s72-c/1604997619632595-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/11/blog-post_10.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/11/blog-post_10.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy