सोरटेवाडीच्या उपसरपंचपदी विकास पवार

Admin
सोरटेवाडीच्या उपसरपंचपदी विकास पवार

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोरटेवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी विकास पवार यांची निवड पार पडली. 
    आज दि ९ रोजी ग्रामपंचायत सोरटेवाडी ची उपसरपंच निवड सरपंच दत्तात्रय तानाजी शेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी सर्वानुमते  विकास विलासराव पवार यांचे एक मताने व बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच  अर्चना संतोष मासाळ यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने रिक्त पदावर  विकास विलासराव पवार यांची निवड झाली. यावेळी उपस्थित नवनाथ उद्योगसमूहाचे अध्यक्ष  संग्राम  सोरटे  ज्ञानदेव कर्चे, विलास  पवार, श्रीपाल सोरटे, ज्ञानदेव सोरटे, विकास केंजळे, सुशांत सोरटे,  संभाजी कर्चे, छाया कोरडे, अलका चव्हाण, लंका सोरटे, सुरेश मासाळ, संतोष गोडसे, संतोष घाडगे, रेश्मा राणी आटोळे, सागर बांदल,  संतोष  ननावरे उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक ज्योती काळभोर यांनी  कामकाज पाहिले.
To Top