निरेतील अमेझॉन दुकान फोडणारा : अट्टल सराईत गुन्हेगार चंद्रकांत लोखंडेला अटक

Admin
निरेतील अमेझॉन दुकान फोडणारा : अट्टल सराईत गुन्हेगार चंद्रकांत लोखंडेला अटक 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

 नीरा (ता.पुरंदर) हद्दीत व्ही एन एस सीटी या अपार्टमेंटमध्ये अमेझॉन कुरियर चे दुकान  चोरट्यांनी लुटून  ७७४९९ रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता.   यातील मुख्य आरोपी चंद्रकांत लोखंडे व त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले 
       जबरी चोरी,चैन स्नेचिंग असे गंभीर गुन्हे करणारा अट्टल सराईत गुन्हेगार लोखंडे लोखंडेच्या मुसक्या अवळण्यात आल्या असून थोड्या कालावधीत चोरट्यांचा माग काढण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
      गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेत असताना आरोपी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे हा वाघळवाडी येथील घारे खानावळी जवळ येणार आहे अशी माहिती मिळाल्यावर सापळा लावून आरोपीला अटक करण्यात आली.  चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय 32 रा.ढवळ ता.फलटण जि. सातारा) श्याम शाशीराव मुळे (वय 20 रा.व्ही एन ए सिटी निरा ता.पुरंदर जि. पुणे मूळ देवी अल्लाळे ता .निलंगा जि. लातूर ) यांना अटक करण्यात आली आहे.अमेझॉन कुरियर मधून चोरीस गेलेले 3 मोबाईल हॅंडसेट व इतर असा एकूण ७७४९६ /-रु किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. मुख्य आरोपी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर एकूण १४ गंभीर स्वरूपाचे दाखल आहेत. आरोपीची वैदकीय तपासणी करून जेजुरी पो स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
  पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट सो ,पोसई अमोल गोरे,पो हवा चंद्रकांत झेंडे ,पोना राजू मोमीन,पोशि अमोल शेडगे, पोशि बाळासाहेब खडके,पोशि अक्षय नवले,  पोशि मंगेश भगत सा फौ जगताप, पो हवा तांबे, पोशि अक्षय जावळे यांनी कारवाई केली.
To Top