आमदार भाई जगताप यांची जेजुरी देवस्थानला भेट : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवडीनंतर घेतले खंडेरायाचे दर्शन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कामगार नेते व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन (इंटक)चे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाई जगताप यांनी आज पहाटे जेजुरी येथे सपत्नीक खंडेरायाचे दर्शन घेतले व अभिषेक केला.
यावेळी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन(इंटक) बारामती यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन(इंटक)चे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य व कोयना जल विद्युत वीज कर्मचारी संघ इंटकचे जनरल सेक्रेटरी पी.के.जगताप, राजेंद्र निगडे सचिव- सासवड विभाग(इंटक), विजय लोखंडे सचिव- बारामती मंडल(इंटक), सचिन दरेकर व इतर पदाधिकारी यांच्या वतीने भाई जगताप यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले सदर कार्यक्रमा दरम्यान जेजुरी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, सासवड नगरपालिकेचे नगरसेवक नंदकुमार जगताप,जेजुरी नगरपालिकेचे नगसेवक अजिंक्य देशमुख, भूषण जगताप, सागर जगताप उपस्थित होते.