सोमेश्वरनगर येथे रक्तदान शिबिराचे उदघाटन संपन्न : अवघ्या दीड तासात ७० बाटल्या रक्तसंकलन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे रक्तदान शिबीराचे उदघाटन उदघाटन पार पडले.
शिबिराचे उदघाटन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे, सोमेश्वर चे संचालक विशाल गायकवाड, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर कदम, सचिव डॉ अमोल जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अमोल भोसले, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले, पत्रकार संघाचे सचिव चिंतामणी क्षिरसागर, माजी अध्यक्ष adv गणेश आळंदीकर, जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, संतोष शेंडकर, युवराज खोमणे, मराठा संघाचे उपाध्यक्ष अभिजित जगताप, शुभम यादव, कुणाल भोसले स्वप्नील गायकवाड, योगेश सोळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
हे रक्तदान शिबीर सकाळी ९ वाजता पार पडले. करंजेपुल येथील कै बाबासाहेब गायकवाड संकुलात हे शिबिर पार पडत आहे. हे शिबीर अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तालुका, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ व बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडत आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास रक्तदान केल्यानंतर एक पाण्याचा जार भेट देण्यात येत आहे. या शिबिराला रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून पहिल्या दीड तासात ७० बाटल्या रक्त संकलित झाले आहे. हे शिबिर सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. कृष्णाई हॉटेल मालक योगेश सोळस्कर यांनी रक्तदात्यांना नास्ताची सोय केली आहे.
COMMENTS