सोमेश्वरनगर येथील रक्तदान शिबिरात १८५ बाटल्या रक्त संकलन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे रक्तदान शिबीरात १८५ बाटल्या रक्त संकलित झाले.
शिबिराचे उदघाटन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे, सोमेश्वर चे संचालक विशाल गायकवाड, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर कदम, सचिव डॉ अमोल जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अमोल भोसले, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले, पत्रकार संघाचे सचिव चिंतामणी क्षिरसागर, माजी अध्यक्ष adv गणेश आळंदीकर, जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, संतोष शेंडकर, युवराज खोमणे, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष अभिजित जगताप, शुभम यादव,
कुणाल भोसले स्वप्नील गायकवाड, योगेश सोळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
हे रक्तदान शिबीर करंजेपुल येथील कै बाबासाहेब गायकवाड संकुलात हे शिबिर पार पडले. हे शिबीर अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तालुका, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ व बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडत आहे. कृष्णाई हॉटेल मालक योगेश सोळस्कर यांनी रक्तदात्यांना नास्ताची सोय केली आहे.
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते अक्षय ब्लड बँकेचे डॉ अजय रूपनवर यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दिवभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे, पुणे बसडेपोचे नियंत्रक रमाकांत गायकवाड, सोमेश्वर चे संचालक किशोर भोसले, सुनील भोसले, गौतम काकडे यांनी शिबिराला भेटी दिल्या.