टोलनाका हटवण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी आक्रमक राहणे गरजेचे
भोर : प्रतिनिधी
माणिक पवार
खेडशिवापूर टोलनाका हटवण्यासाठी शिवापूर कृती समितीने उभारलेल्या शेवटच्या आंदोलनात सुट दिलेले पाचही तालुक्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनपुरते सहभागी न होता टोलनाका हटवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आक्रमक राहणे गरजेचे असल्याचे शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने आवाहन केले असून आगामी काळात गनिमी काव्याने न सांगता आंदोलन होणार असल्याचा ईशारा प्रशासनाला समितीने दिला आहे.
लॉकडाऊनमुळे शिवापूर टोलनाका हटाव मोहिम तूर्तास स्थगिती केली होती, मात्र खेडशिवापूर येथील टोलनाका ( ता. हवेली ) हटवण्यासाठी शिवापूर टोल हटाव कृती समिती पुन्हा आक्रमक झाली असून याबाबत केळवडे येथे समितीची रविवारी दि. २० रोजी बैठक झाली. शेवटच्या आंदोलनावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेले शब्द पाळून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन तातडीने टोलनाका हटवण्यासाठी आग्रही राहणे गरजेचे असल्याचे समितीने भूमिका मांडली आहे. यावेळी समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, डॉ. संजय जगताप, शुभम यादव, शेतकरी संघटनेचे दादासाहेब पवार, शहाजी अडसूळ, आदी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
ज्ञानेश्वर दारवटकर यांनी यावेळी सांगितले कि, टोलनाकाहटवणे हीच स्थानिक आणि समितीची प्रमुख मागणी आहे. फेब्रुवारीच्या आंदोलनाच्यावेळी केंद्रीय पातळीवर चर्चा करण्यासाठी आंदोलन स्थगित केले होते, त्यात दुर्दैवाने कोरोनाचे संकट ओढवले. दरम्यानचे मुख्य निर्णय होईपर्यंत एमएच १२ आणि एमएच १४ पासिंगच्या स्थानिक वाहनांना टोलमाफी दिली जाईल असे लेखी पत्र दिले असूनही १ जानेवारीपासून होणारी टोलवसुली कदापि सहन करणार नाही. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई न करता तब्बल आठ वर्ष त्यांना वारंवार मुदतवाढ कशी दिली जाते असा सवाल करत रिलायन्सच्या दहशतीखाली प्रशासन आहे का? असा खडा सवालही बैठकीत दारवटकर यांनी उपस्थित केला.
पुणे - सातारा महामार्गावर अपघात प्रवणक्षेत्रमुळे अनेकांचे बळी जात आहे, मात्र पोलिसांनाकडून चालकावरच हयगय केली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो. सदोष मनुष्यवधाच्या बाबत ठेकेदार आणि सबंधितवर गुन्हा दाखल करण्यात यावी. अपघातात बाबत ठेकदार आणि एनएचआयच्या संबधितअधिकारी यांच्यावर दाखल करण्यात पोलिसांकडून कुचराई करून केवळ वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने संबधित पोलिस स्टेशनला जबाबदार धरले जावे अशी मागणी करणार असल्याचे ज्ञानेश्वर दाटवटकर सांगितले.
योग्य वेळ आल्यावर याचिका दाखल करणार - ज्ञानेश्र्वर दारवटकर, समिती निमंत्रक
कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी मागचे निर्णय घ्यावे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तातडीने बैठक घेऊन लोकप्रतिनिधींनी निर्णायक भूमिका घेऊन आक्रमक राहणे गरजेचे आहे. टोलनाकाबाबत येथून पुढचे आंदोलने गनिमी काव्याने होणार '
-