सोमेश्वरनगर परिसरात बंद ला उस्फुर्त प्रतिसाद : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांचा पाठिंबा

Admin
सोमेश्वरनगर परिसरात बंद ला उस्फुर्त प्रतिसाद : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांचा पाठिंबा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

आजच्या भारत बंद ला सर्वच स्तरातून उस्फुर्त पाठिंबा मिळत असून बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातून व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवत उस्फुर्त पाठिंबा दिला. 
          करंजेपुल येथील सर्व बाजारपेठा बंद असुन आजचा मंगळवार चा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सोमेश्वरनगर परिसरातील शेतकऱ्यांनी बंद ला पाठिंबा जाहीर करत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या तोट्याचे नवीन तीन कायदे अंमलात आणले आहेत, हे कायदे पूर्णतः शेतकऱ्यांच्या तोट्याचे असून ते तात्काळ रद्द करावेत, तसेच आजच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र शेतकऱ्यांच्या वतीने वडगाव निंबालकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, तसेच पो कॉ, ज्ञानेश्वर सानप, पो कॉ. वाबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी 
राष्ट्रवादी चे युवा कार्यकर्ते ऋषिकेश गायकवाड, सागर गायकवाड, निलेश गायकवाड, गणेश जाधव, हरीश गायकवाड, सुहास गायकवाड यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
To Top