आज बारामतीत तालुक्यात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्या काही कमी होण्याच नाव घेत नसून रोज रुग्णसंख्येचा चढ उतार सुरू आहे, काल तालुक्यात २८ जण कोरोना बाधित सापडले होते तर आज हीच संख्या ४९ वर गेली आहे. यामध्ये शहरातील २५ तर ग्रामीण भागातील २४ जणांचा समावेश आहे.
काल दि ८ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने १९३.
एकूण पॉझिटिव्ह-३३ .
प्रतीक्षेत ००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१६ त्यापैकी पॉझिटिव्ह -९. कालचे एकूण एंटीजन ६०. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-७.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४९
शहर-२५ . ग्रामीण- २४.
एकूण रूग्णसंख्या-५३२६
एकूण बरे झालेले रुग्ण- ४७४८
एकूण मृत्यू-- १३२.