खुशखबर... लस आली रे २ जानेवारी पासून सुरुवात.. राज्यातील ४ जिल्ह्याची निवड
मुंबई : प्रतिनिधी
कोरोना लसीकरणाचा ड्राय रनला 2 जानेवारीपासून देशभरात सुरुवात होत असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संदर्भात घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या ड्राय रन लसीकरणाला सुरुवात होत आहे.
COMMENTS